10 September, 2010

श्री राज ठाकरे यांसी ,

'
श्री राज ठाकरे यांसी,


मी काँग्रेसी नाही,

म्हणून माझा तुम्हाला साष्टांग दंडवत नाही,




शिवसैनिक नाही म्हणून जय महाराष्ट्र नाही,

वैदर्भीय नाही म्हणून जय विदर्भ नाही,

भाजपाई नाही म्हणून जय श्रीराम नाही,

आणि भीमसैनिक नाही, म्हणून जय भीम पण नाही.




ब्राह्मण नाही, म्हणून जय परशुराम नाही

मराठा नाही, म्हणून जय जिजाऊ नाही

धनगर नाही, म्हणून जय मल्हार नाही,

माळी नाही, म्हणून जय सावता नाही

वंजारी नाही, म्हणून जय भगवान नाही

कोळी नाही, म्हणून जय वाल्मिकी नाही

चांभार नाही, म्हणून जय रोहिदास नाही

न्हावी नाही, म्हणून जय जीवा नाही,

लिंगायत नाही, म्हणून जय शिवा नाही

मुस्लिम नाही, म्हणून सलाम आलेकुम नाही


आणि नक्षलवादी नाही, म्हणून लाल सलाम पण नाही..




लहानपणी, मराठीच्या गुरूजींनी

पत्रलेखनाच्या मायन्यात शिकवलं होतं,

तेच लिहितोय,



सप्रेम नमस्कार.




पत्रास कारण की,


मला फक्त एवढंच विचारायचं होतं, की

वरीलपैकी कुणासाठी करताय एवढं सगळं??





त्यांच्यातला एक जण पण,


फक्त मराठी नाहीय!!!!!


- डॉ. रविराज कुलकर्णी


.

6 comments:

Yogesh said...

जबरदस्त....लाखात एक पोस्ट आहे....राज ्ठाकरेंपर्यंत जरुर पोहचली पाहिजे... :) :)

Marathi Paul said...

डॉक्टर साहेब किती सुंदर लिहीलय, खरच श्री राज ठाकरेंनी एकदा जरुर वाचावी अशी झालीय, मी या संर्दभात माझ्या ब्लॉगवर थोडफार लिहीलय, वेळ मिळाल्यास भेट द्या, जरुर वाचा.

Ajay Sonawane said...

jabaradast...dusra shabdach nahit

Nisha Bagul said...

जातीचा (किंवा पक्षाचा) आणि भाषेचा काय संबंध ?

Asha Joglekar said...

खरंच राज ठाकरेंना पाठवाच हे पत्र.

Unknown said...

I LIKE YOUR THOUGHTS, WHERE ARE U & WHAT ARE U DOING NOW

REGARD
GANESH ZODGE
AURANGABAD
GANESHDZODGE@GMAIL.COM