27 October, 2009

साहेब, काय केलत हे???

.

कालच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे चक्क लहान मुलानी भाषण पाठ केल्यासारखे बोलले.
प्रश्न काय, उत्तर काय, कशाचा ही कशाला संबंध नाय !!!

"गरज पडल्यास हिंदुत्व" ही नवी व्याख्या, नवी कल्पना भारतीय राजकारणात काल त्यानी आणली।
आणि शिवसेनेचा पराभव झाला नाही म्हणने तर बालिशपणाचे नाही तर वेडगळपणाचे आहे.
"एक ही आमदार निवडून न येण" अशी कदाचित त्यांची पराभवाची कल्पना असेल !!

मराठी माणूस आज पण शिवसेनेच्याच पाठीशी आहे,
कारण शिवसेना ही मराठी मनाची भावनिक गरज आहे..
राज ठाकरे चालवतात ती शिवसेना आहे, मग त्यांच्या पक्षाचं नाव काहीही असो...
राज आज दोन आकड्यात खेळत आहेत, २०१४ ला तीन आकड्यात खेळणार हे नक्की...

मुळात उद्धव ची काहीच चुक नाही, त्यांच्यात पात्रताच नाही तर ते तरी बिचारे काय करणार??? !!!

महाराष्ट्राचे दुर्दैव, दुसरे काय !!! महाराष्ट्रपुरुष ढसढसा रडत असेल आज!!!

खंत फक्त एवढीच आहे, की शेवटच्या काळात बाळासाहेबाना हे दिवस बघावे लागले...
विधानसभेवर भगवा फडकल्यानंतर साहेब दाढी काढणार होते...

.

3 comments:

छोटा डॉन said...

Agadi achuk viShleShaN kele aahe ...
Lekh aavaDalaa !

>>मुळात उद्धव ची काहीच चुक नाही, त्यांच्यात पात्रताच नाही तर ते तरी बिचारे काय करणार??? !!!
U Said It ...!!!

अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे said...

बाळासाहेबाची स्थिती धुतराष्ट्रा सारखी झाली आहे. महाभारतातील दुर्योधन तरी पराक्रमी पण जनतेला दोष देणारा राजकारणी लोकशाहीच्या जागतिक इतिहासातील प्रथम नेता ? उध्दव ठाकरे हा आहे.

Dr Raviraj Kulkarni said...

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..